व्यसनांधिन रुग्णमित्रांसाठी सर्वोत्कृष्ट पुनर्वसन केंद्र” म्हणून दिल्लीत चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा सन्मान

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नितीन विसपुते यांनी स्वीकारला सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) : येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राला “व्यसनाधिन रुग्ण मित्रांसाठी सर्वोत्कृष्ट एकात्मिक पुनर्वसन केंद्र” म्हणून केंद्र सरकारच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन नवी दिल्ली येथे दि. २६ जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधीदिनी गौरविण्यात आले आहे. आयुष, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने संचालक नितीन विसपुते व चेतना विसपुते यांनी स्वीकारला.

राष्ट्रीय परिसंवाद आणि पुरस्कार कार्यक्रम अंतर्गत संस्थेच्या उत्कृष्ट कार्यबद्दल नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सन्मानित करण्यात आले आहे. संबंधित व्यसनमुक्ती क्षेत्रात आणि सामाजिक जबाबदारीत गेल्या वर्षभरात दाखवलेल्या एकूण उत्कृष्टतेवर आधारित आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय व्यासपीठावर देण्यात आला आहे. पुरस्कार देताना आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह पॅलेस्टाईनचे राजदूत सेब्रतो उपस्थित होते. कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. ओमराजे निंबाळकर, खा. राजाभाऊ वाजे, आयुष इन्स्टिट्यूटचे संचालक संदीप तांबारे, इंटिग्रेटेड अचिवर्सच्या संचालिका जुही सबरवाल, डॉ. राहुल सूर्यवंशी व डॉ. प्रशांत खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजात वाढत चाललेले पदार्थाचे व्यसन हि फार मोठी समस्या आपल्या देशासमोर उभी आहे. आज चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र अमली पदार्थांच्या व्यसनांना आळा घालण्यासाठी मोठे योगदान देत आहे. शाळा कॉलेज येथे जाऊन विद्यार्थांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगण्याचे महत्वाचे काम नितीन विसपुते व चेतना विसपुते हे चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमाने गेल्या १५ वर्षापासून करत आहे. आजपर्यंत दहा हजारांहून अधीक रुग्ण मित्र व्यसनमुक्त झालेले आहे. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, आ. राजुमामा भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *